अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- ब्राझील मध्ये गेल्या काही वर्षात एचआयव्ही एड्सच्या रुग्णांची संख्या वाढल्याने आणि लग्नाआधी गर्भधारणा होण्याच्या घटनाही मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. या घटनांमुळे सरकार हैराण झाल्याने सरकारला एक विचित्र आवाहन करावे लागलेय.
या देशातील तरूणांच्या शारीरिक संबंधाच्या सवयीमुळे सरकार हैराण झालं असून त्यांनी तरूणांना ‘लग्नाआधी शारीरिक संबंध ठेवू नका’ असं आवाहन केलंय.
, पार्टी किंवा मजा-मस्ती जरुर करा. सेक्स शिवाय सुद्धा तुम्ही मजा-मस्ती करु शकतात. मात्र, लग्नापूर्वी सेक्स करु नका. या संदर्भात तरुणांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी ‘आय चूज ट वेट’ नावाने सरकार मोहिम सुद्धा राबवत आहे.
ब्राझीलमधील मानवाधिकार आणि कुटुंबकल्याण मंत्री डामारेस एल्वेस यांनी यांनी तरुणांना संयम ठेवण्याचं आवाहन केलं आहे.
त्यांच्या मते, तरुण-तरुणी हे सामाजिक दबाव, परिस्थिती आणि जुने विचार यामुळे सेक्स करतात. पार्टी दरम्यान सेक्स करण्याचा ट्रेंड बनला आहे आणि हे जरुरी नाहीये असंही डामारेस एल्वेस यांनी म्हटलं आहे.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com