अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :- श्रीगोंदे तालुका खादी ग्रामोद्योग संघाच्या अध्यक्षपदी बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहाटा यांचे खंदे समर्थक व खादी ग्रामउद्योग संघाचे माजी अध्यक्ष अंकुश शिंदे यांचे भाचे शुभम घाडगे यांची नवनिर्वाचित अध्यक्ष, तर उपाध्यक्षपदी रज्जाकभाई शेख यांनी बाजी मारली.
त्यामुळे पुन्हा नाहाटा गटाचा खादी ग्रामोद्योग संघावर झेंडा फडकला आहे.अडीच वर्षांपूर्वी झालेल्या झालेल्या निवडणुकीत अकरांपैकी नाहाटा गटाला अवघी एक जागा मिळाली होती.
गेल्या महिन्यात संघाचे अध्यक्ष नंदकुमार ससाणे, उपाध्यक्ष निवृत्ती कोकाटे यांनी राजीनामा दिला होता. या संधीचा बाळासाहेब नाहाटा यांनी फायदा उठवला.
सत्ताधारी गटाचे नंदकुमार ससाणे, बापू कसबे, विठ्ठल माने, शुभम घाडगे, रज्जाकभाई शेख हे सदस्य नाहाटा यांच्या गळाला लागले.
अध्यक्षपदासाठी शुभम घाडगे यांना सहा, तर संध्या ससाणे यांना पाच मते मिळाली. तर उपाध्यक्षपदाच्या निवडीत रज्जाकभाई शेख यांना सहा, तर संजय शिंदे यांना पाच मते मिळाली.
संघाच्या या राजकीय उलथापालथीत बाळासाहेब नाहाटा यांचे समर्थक संघाचे माजी अध्यक्ष अंकुश शिंदे व भगवानराव गोरखे व लियाकत तांबोळी यांनी विशेष लक्ष घातले होते.
तसेच रफीक इनामदार, सत्यवान शिंदे, आबासाहेब तोरडमल, कांतीलाल कोकाटे, मनोज घाडगे, संतोष गोरखे, सदिकभाई शेख यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
निवडीनंतर सर्वांनी यावेळी जल्लोष केला. खादी ग्रामोद्योग संघाच्या अध्यक्षपदी शुभम घाडगे व उपाध्यक्षपदी शेख यांची निवड झाल्यावर असा जल्लोष केला.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved