या मुळे वाढतोय कोरोना; पहा काय म्हणाले नामदार प्राजक्त तनपुरे …

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,21 जुलै 2020 :-  राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. अनेक उपाययोजना करूनही कोरोना संक्रमणाचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. देशभरातील एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांचीसंख्या सर्वाधिक आहे.

या पार्श्वभूमीवर बोलताना मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे म्हणाले, की अनलॉक बिगिन दरम्यान मोजक्या लोकांकरिता अटी शर्तीसह लग्न समारंभाला परवानगी देण्यात आली. मात्र तसे न होता लग्नात गर्दी बघायला मिळत आहे.

अशा गर्दीतूनच कोरोनाचा फैलाव होत आहे. पाथर्डी तालुक्यात कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर तनपुरे यांच्या उपस्थितीत अधिकारी व पदाधिकार्‍यांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.

यावेळी प्रांतधिकारी देवदत्त केकाण, तहसीलदार नामदेव पाटील आदींसह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. महसूल, आरोग्य,

पोलीस विभागांना वाढत्या करोना रुग्णाच्या उपाययोजनेबाबत योग्य त्या सूचना यावेळी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिल्या. दरम्यान, अहमदनगरमध्ये कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे.

पाथर्डी तालुक्यातही रुग्णसंख्या झपाट्याने वाढत चालली आहे. जवळपास हा आकडा दीडशेपार गेला आहे. त्यामुळे पाथर्डीत प्रशासन सजग झाले असून त्यादृष्टीने राबविण्याच्या उपाययोजनांसंदर्भात ही बैठक घेण्यात आली.

  • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24