महिला वेटरनरी डॉक्टरचा बलात्कार व हत्या करणाऱ्या आरोपींचा असा झाला एनकाउंटर

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

हैद्राबाद: महिला वेटरनरी डॉक्टरसोबत झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणातील चारही आरोपींचा पोलिसांनी  एनकाउंटर केला. ही संपूर्ण घटना काल  सुमारे पहाटे 3 ते 6 दरम्यान झाली.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत होते त्यामुळे त्यांच्यावर गोळी चालवली गेली.

पोलिस कमिश्नर वीसी सज्जनर म्हणाले की, “रिमांडच्या चौथ्या दिवशी आम्ही त्यांना बाहेर घेऊन आलो, त्यांनी आम्हाला पुरावे दिले. त्यांनी सांगितलेले पुरावे शोधण्यासाठी आम्ही घटनास्थळावर आलो होतो, यावेळी आरोपींनी पोलिस कर्मचाऱ्याच्या दोन बंदुका घेऊन फायरिंग केली.

त्यांच्या फायरिंगला प्रत्युत्तर देण्यासाठी पोलिसांनी फायरिंग सुरू केली. या चकमकीत चारही आरोपींचा खात्मा झाला तर एक SI आणि कॉन्स्टेबल जखमी झाले.”

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24