कोरोना रुग्ण सापडल्याने श्रीगोंदा तालुक्यातील हा भाग सील

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,27 मे 2020 :- पुणे जिल्ह्यातील कोरोना संक्रमित भागातून श्रीगोंदे फॅक्टरी परिसरात परतलेल्या व्यक्तीचा अहवाल मंगळवारी पॉझिटिव्ह आला.

खबरदारीचा उपाय म्हणून श्रीगोंदे स्टेशन गेट ते ढोकराई फाट्यापर्यंतचा परिसर सोमवारी मध्यरात्रीपासून प्रतिबंधात्मक क्षेत्र घोषित करण्यात आला, अशी माहिती तहसीलदार महेंद्र माळी यांनी दिली.

२२ मे रोजी ही व्यक्ती गावी आल्यावर तिला श्वसनाचा त्रास जाणवत होता. २३ मे रोजी काष्टीतील रुग्णालयात तपासण्यासाठी गेल्यावर डॉक्टरांनी श्रीगोंद्यातील ग्रामीण रुग्णालयात पाठवले.

२३ व २४ मे रोजी ग्रामीण रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर या रूग्णाला जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कारखाना परिसर सील करण्यात आला. अत्यावश्यक सेवा, वस्तू विक्री ८ जूनपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

अहमदनगर लाईव्ह 24