अहमदनगर Live24 टीम ,8 जुलै 2020 : मागील काही दिवसांपासून अहमदनगरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. संगमनेरमध्ये कोरोनाचा जणू विस्फोट झाला आहे.
संगमनेरमध्ये कोरोना संक्रमणाचे प्रमाण लक्षणीय आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा हा मतदारसंघ असून कोरोनाची परिस्थिती आणखी बिकट झाली आहे.
नगर जिल्ह्यात एकूण रुग्णांपैकी सर्वाधिक १६५ रूग्ण संगमनेर तालुक्यात आढळून आले आहेत. त्यापैकी १२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
२५ जूनला संगमनेर तालुक्यातील कुरणमधील एका ८५ वर्षीय महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर २५ जून ते ७ जुलै या काळात सर्वाधिक ४९ रूग्ण हे केवळ कुरणमध्ये आढळून आले.
त्यापैकी ४२ जणांवर उपचार सुरू असून सात जण कोरोनामुक्त झाले आहेत. अजुनही ४० जणांचे अहवाल येणे बाकी आहे. संसर्गाचा वाढता धोका लक्षात घेता येथील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना ६ ते १९ जुलै दरम्यान बंद ठेवण्याचे आदेश तहसीलदार अमोल निकम यांनी दिले आहेत.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews