कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आक्रमक दिला हा इशारा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 02 फेब्रुवारी 2021:- कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी अधिकच आक्रमक झाले असून, ६ फेब्रुवारीला दुपारी १२ ते ३ या वेळेत देशव्यापी चक्का जाम आंदोलन करणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.

राष्ट्रीय आणि राज्य मार्गांवर या दिवशी रास्ता रोको केला जाईल. संयुक्त किसान मोर्चाचे नेते बलबीर सिंह राजेवाल यांनी याबाबतची माहिती दिली आहे. तर, सरकारशी चर्चा करायला तयार असल्याचे शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी म्हटले आहे.

सरकारने चर्चेद्वारे या समस्येतून मार्ग काढावा. आम्ही चर्चेसाठी तयार आहोत, किसान मोर्चाच्या ४० संघटनांची जी ४० सदस्यीय समिती आहे, समितीशी सरकारने चर्चा करावी, असे टिकैत यांनी म्हटले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24