थोरात कार्यकर्त्यांनी आतषबाजी करत केला जल्लोष

Published by
अहमदनगर लाईव्ह 24
संगमनेर: बाळासाहेब थोरात यांना महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात महसूल, ऊर्जा व शालेय शिक्षण खात्याची जबाबदारी मिळाल्याने कार्यकर्त्यांनी आतषबाजी करून ‘यशोधन’समोर गुरुवारी जल्लोष केला.
थोरात यांनी यापूर्वी महसूल खात्याची जबाबदारी सक्षमपणे सांभाळताना या खात्याला लोकाभिमुख व गतिमान केले होते. महसूल विभाग हायटेक बनवताना ऑनलाईन सात-बारासह पारदर्शी व चांगल्या कामातून या विभागाची लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद केली होती.
त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी थोरात यांच्याकडे महत्वाच्या अशा महसूल खात्याची जबाबदारी दिली. त्याचबरोबर ऊर्जा व शालेय शिक्षण, पशुवैद्यकीय या खात्यांच्या भार थोरात यांच्याकडे असणार आहे.
अडचणीच्या काळात पक्षाला ऊर्जितावस्था देणाऱ्या थोरात यांनी गोरगरिबांच्या विकासाचा विचार केला. यामुळे मंत्रिमंडळात शेतकऱ्यांचे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. अनेक दिवस लांबलेल्या खातेवाटपावर शिक्कामोर्तब होताच संगमनेरात एकच जल्लोष करण्यात आला.
अमृतनगर, यशोधन कार्यालय, थोरातांचे निवासस्थान, तसेच नवीन नगर रोड, सय्यद बाबा चौक अशा विविध ठिकाणी कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी केली.
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24