ज्यांना व्यासपीठ राहिले नाही, ते कोणत्याही व्यासपीठाचा वापर राजकारणासाठी करतात

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,12 ऑक्टोबर 2020 :- जिल्ह्यात कोरोनाचे संकट कायम असताना कोरोनामुक्त जिल्ह्यासाठी प्रशासनासह लोकप्रतिनिधी देखील पुढाकार घेताना दिसत आहे. नुकतीच कोरोनाच्या विळख्यात अडकलेले नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे एका कार्यक्रम उदघाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी माजी आमदार शिवाजी कर्डीले यांच्यावर चांगलीच टीका केली आहे.

नामदार प्राजक्त तनपुरे मित्रमंडळ व राहुरी तालुका मेडिकल असोसिएशनतर्फे बालाजी मंदिर ट्रस्टच्या मंगल कार्यालयात उभारलेल्या राहुरी डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरच्या उद्‌घाटनप्रसंगी मंत्री तनपुरे बोलत होते.

राहुरी महाविद्यालयातील कोविड सेंटरला शुभेच्छा आहेत; परंतु त्याच्या उद्‌घाटनप्रसंगी माझ्यावर राजकीय टीका उचित नव्हती. ज्यांना व्यासपीठ राहिले नाही, ते कोणत्याही व्यासपीठाचा वापर राजकारणासाठी करीत आहेत, असा टोला मंत्री तनपुरे यांनी माजी आमदार कर्डिले यांना लगावला.

तसेच जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीवर भाष्य करताना तनपुरे म्हणाले की, कोरोना रुग्णसंख्या घटत असली, तरी दुसरी लाट येण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे काळजी गरजेची आहे. राहुरी डेडीकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटर तज्ज्ञ डॉक्‍टरांच्या अधिपत्याखाली वैद्यकीय सुविधांसह सज्ज आहे. अशी ग्वाही नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली.

तसेच कोरोनाच्या काळात स्वतःबरोबरच कुटुंबीयांची काळजी घेणे प्रत्येकाची जबाबदारी आहे. तसेच प्रशासनाने विनामास्क फिरणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, असे तनपुरे यावेळी बोलताना म्हणाले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24