संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस यांना जीवे मारण्याची धमकी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 :-  दिल्लीतील तबलिगी जमातच्या मरकज येथील कार्यक्रमानंतर संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस यांनी लेख लिहिला होता. त्याचा राग मनात धरून त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.

या प्रकरणी दोघांविरुद्ध शुक्रवारी श्रीगोंदे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तुम्ही तबलीग जमातविषयी लिहू नका; अन्यथा हात-पाय तोडून टाकू, जिवंत ठेवणार नाही अशा धमक्या भोस यांना व्हाॅटसअॅपवर देण्यात आल्या.

त्यांनी पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्याकडे तक्रार केली होती. त्यांनी शहानिशा करून दोन अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला.

पुढील तपास हेड कॉन्स्टेबल पितळे करत आहेत. विचारांचा सामना विचारांनी करावा; अन्यथा जशास तसे उत्तर देण्यास संभाजी ब्रिगेड खंबीर असल्याचे भोस म्हणाले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24