अहमदनगर Live24 टीम, 6 जानेवारी 2021 :- नायलाॅन मांजाची विक्री करणाऱ्या राहुरी शहरातील काही दुकानांवर पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली. तसेच नायलाॅन मांजा जप्त करून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
नायलॉन मांजा घातक आहे हे माहीत असताना राहुरी शहर हद्दीतील मल्हारवाडी रोड परिसरातील अजिज फिरोज शेख, वय ३६ वर्ष याने त्याच्या न्यु किस्मत किराणा दुकान आणि आझाद चौक येथील अशोक मुळचंद राका,
वय ५३ वर्ष याने त्याच्या राका दुकानात तसेच क्रांतिचौक येथील विजय विठ्ठल सिन्नरकर याने त्याच्या हरिओम माऊली दुकानात नायलाॅन मांजाची विक्री सुरू ठेवली होती.
अजिज शेख, अशोक राका व विजय सिन्नरकर या तिनही व्यापाऱ्यांनी नायलॉन मांजाची विक्री करत असताना मिळून आले. या, घटनेत अजिज फिरोज शेख, अशोक मुळचंद राका व विजय विठ्ठल सिन्नरकर या तीन व्यापार्यावर पोलिस हवालदार दिगंबर मोहन सोनटक्के यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला.