अहमदनगर Live24 टीम ,27 जून 2020 : श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे गावात भिवंडी येथुन आलेली तीन जण पॉझिटिव्ह आलेले आहेत. त्यांच्या बरोबर इतर चौदा जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.नितीन खामकर यांनी दिली आहे.
तालुक्यातील विविध गावातील 20 जणांच्या घशाचे स्त्राव घेऊन त्यांची कोरोना चाचणी केली होती. त्यातील येळपणे येथील तीन जण पॉझिटीव्ह आल्याने श्रीगोंदेकरांची धास्ती पुन्हा वाढली आहे.
बाहेर गावातून आलेले तीन जण पॉझिटिव्ह सापडले असल्याने गावकऱ्यांची धास्ती वाढली आहे. आता गावात आलेल्या या तीन जनांच्या संपर्कात आलेले व्यक्ती यांची ही तपासणी होणार आहे.
दोन पुरुष व एका महिलेचा त्यात समावेश आहे. भिवंडी येथून हे लोक कोरोना घेऊन गावात आले आहेत. इतर 17 जण निगेटिव्ह आहेत.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर म्हणाले , सुरेगाव येथील अहवाल निगेटिव्ह आला आहे. तेथील लोकांमध्ये घबराट होती पण ती संपली आहे. श्रीगोंदा शहर, अजनुज येथील अहवाल निगेटिव्ह आले.मात्र येळपणे येथील तिघांमुळे अडचणी वाढल्या आहेत.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews