अहमदनगर Live24 ,31 मे 2020 :- कर्जत तालुक्यातील राशीन येथील एकाच कुटुंबातील तिघाजणांना कोरोना ची बाधा झाली आहे तालुक्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या आता सहा झाली आहे.
कर्जत तालुक्यातील राशीन येथील पुणे येथून पत्नीस भेटून आलेल्या व्यक्तीला कोरोना ची बाधा झाली असल्याचे निष्पन्न होताच आरोग्य विभागाने तात्काळ त्याच्या कुटुंबातील चार जणांना नगर येथे जिल्हा रुग्णालयांमध्ये तपासणीसाठी घेऊन गेले होते.
या चौघांचा अहवाल प्राप्त झाला असून यामधील त्या व्यक्तीचे वडील व मुलगी हे दोघे कोरो ना बाधित आढळून आले आहेत या यामुळे राशील परिसरात व तालुक्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
करोना बाधित आढळून आलेले रुग्ण हे स्थानिक आहेत यांच्या संपर्कात अनेक जण आलेले आहेत यामुळे कोरोना याची बाधा अनेकांना होऊ शकते या पार्श्वभूमीवर ही साखळी तोडण्याचे मोठे आव्हान आता प्रशासनाला स्वीकारावे लागणार आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews