संतापजनक:  म्हणून महिलेने स्वत: च्या 6 वर्षांच्या मुलीवर ओतले ‘पेट्रोल’

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

नवी दिल्ली : देशभर निविध समाज माध्यमातून  उन्नाव आणि हैदराबाद बलात्कार प्रकरणी रोष केला जात आहे. दिल्ली येथे मात्र  एक अजब घटना घडली.  सफदरगंज रुग्णालयाबाहेर एका महिलेने बलात्काराचा निषेध म्हणून स्वत:च्या 6 वर्षांच्या मुलीवर पेट्रोल ओतले. रुग्णालय परिसरात शनिवारी दुपारी ही घटना घडली.

उन्ना बलात्कार पीडितेचा मृत्यू झाल्यानंतर तिचा मृतदेह रुग्णवाहिकेतून गावात नेत असताना . त्या महिलेने “आम्हाला न्याय हवा” अशी घोषणाबाजी सुरू केली. आणि आपल्या 6 वर्षांच्या मुलीवर पेट्रोल ओतले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  उन्ना बलात्कार पीडितेचा मृत्यू झाल्यानंतर तिचा मृतदेह रुग्णवाहिकेतून गावात नेला जात होता. त्याच क्षणी संबंधित महिलेने “आम्हाला न्याय हवा” अशी घोषणाबाजी सुरू केली.

काही मिनिटांतच तिने आणलेला ज्वलनशील द्रव आपल्या मुलीच्या अंगावर ओतला. सुदैवाने, पोलिसांनी महिलेला अडवून चिमुकलीचा जीव वाचवला.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24