अहमदनगर Live24 टीम ,5 जुलै 2020 : नेवासे तालुक्यातील महालक्ष्मी हिवरे येथे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात पाच शेळ्या ठार झाल्याची घटना ताजी असतानाच अकरा वर्षाच्या मुलावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली.
परंतु त्याचे नशीब बलवत्तर म्हणून त्याच्या मामा आणि मामीच्या प्रसंगावधानतेमुळे त्याचे प्राण वाचले. या प्रकारांमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी: येथील शेतकरी आदिनाथ रंभाजी सांगळे हे व त्यांची पत्नी रेणुका त्यांचे शेतात घास कापण्यासाठी गेले होते.
समवेत त्यांचा भाचा अभय रामभाऊ शिरसाठ देखील गेला होता. त्याचे मामा-मामी पुढे घास कापत होते, तर मागे अभय घासाच्या पेंढ्या गोळा करण्याच्या नादात होता.
पाठीमागे उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अभयवर झडप मारली. त्याला आपल्या जबड्यात घट्ट पकडले मामीने पाठीमागे घासाची मूठ टाकण्यासाठी मान वळवली,
तर अभयला बिबट्याने पकडलेले त्यांनी पाहताच मामा व मामीने ओरडत दोघांनी त्या बिबट्याच्या दिशेने पंधरा ते वीस फुटाच्या अंतरावर धाव घेतली.
त्याच्या मामाने व मामिने मोठे धाडस दाखवून जबड्यात धरलेल्या अभयला मृत्यूचे दाढेतून काढले. त्यांच्या ओरडण्याने शेजारचे शेतकरी धावले. तोपर्यंत बिबट्या उसात पळून गेला.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने घटनास्थळास भेट दिली.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews