अहमदनगर – लॉकडाऊनमधून सदर रिक्षा वाहतुकीला शिथीलता देवुन शासनाने परमिट, परवाना दिलेल्या ऑटो रिक्षा चालकांना वाहतुकीची परवानगी द्यावी अथवा जिल्हा पातळीवर आर्थिक मदत-मानधन उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी अहमदनगर सोशल क्लब फाऊंडेशनच्यावतीने जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या शहराबरोबरच राज्य व देशपातळीवर कोरोना वायरसमुळे लॉकडाऊन, तर काही भागात ‘हॉटस्पॉट’ लावण्यात आलेले आहे.
अनेक गोरगरीब जनता, नागरिक यामधे कामगार, मजुर शेतकरी, टॅक्सी ड्रायव्हर, छोटे – छोटे व्यावसायिक, हातावर पोट भरणारे, रोजच्या रोज काम करुन आपला उरनिर्वाह करत असतात.
मुश्कीलीने मिळवणारे रिक्षावाले यांच्यावरही सध्या उपासमारीची वेळ आली आहे. सध्या सार्वजनिक वाहतुकीची साधने बंद असल्याने गरीब, श्रीमंत सर्वांनाच रिक्षा वाहतुकीची आवश्यकता भासत आहे.
जीवनावश्यक वस्तूंची ने-आण, ज्येष्ठ नागरिकांना दवाखाना, बँक येथे जाण्यासाठी रिक्षाची आवश्यकता भासत आहे. सोशल डिस्टसिंग व इतर सर्व शासनाच्या नियमांचे पालन करण्यास रिक्षा चालक तयार आहेत, असेही निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनावर अध्यक्ष नईम सरदार, सेक्रेटरी इम्रान खान, कासमभाई केबलवाला, मोसीम शेख, दानिश शेख, डॉ.साहिल अहेमद, हमजा चुडीवाला, राजमोहम्मद नुरी, जावेद खान, शादाब शेख, अर्यान नईम आदींनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे केली आहे. सदर निवेदनावर सुमारे 60 रिक्षा चालकांच्या सह्या आहेत.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर This Story First Publish on Ahmednagarlive24.com®