तर आज कोपरगावचा चेहरामोहरा बदलला असता

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :-कोपरगाव शहराच्या विकासासाठी नगराध्यक्षांना सहकार्य करण्याच्या सूचना राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना दिल्या होत्या. त्यामागे शहराचा विकास व्हावा ही एकमेव भूमिका होती.

यापुढेही ती कायम असून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी निधी देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले. विविध रस्त्यांचे भूमिपूजन आमदार काळे यांच्या हस्ते व नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.

आमदार काळे म्हणाले, जिल्हा नियोजनमधून विकासकामांसाठी २ कोटी व नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीसाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत २ कोटी आणले. ज्या ठिकाणी आवश्यकता भासेल, त्या ठिकाणी खंबीरपणे उभे राहून निधी आणू. रस्ते, पिण्याचे पाणी,

आरोग्य आदींसह नागरिकांचे सर्वच मूलभूत प्रश्न सोडवून शहराला जोडलेल्या ग्रामीण भागाचाही विकास करू, असे आश्वासन त्यांनी दिले. नगराध्यक्ष वहाडणे म्हणाले, शहराचा विकास करताना आमदार काळे व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचे सहकार्य मिळते. मात्र, मागील पाच वर्षांत माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी सहकार्य केले नाही.

त्यांचे नगरसेवक त्यांचाच कित्ता गिरवत असून विकासकामांना विरोध करत आहेत. त्यांनी सहकार्य केले असते, तर आज कोपरगावचा चेहरामोहरा बदलला असता. माजी आमदारांना ५ वर्षांत पाच नंबर साठवण तलावाचे काम करता आले नाही. आमदार काळे यांनी निवडून येताच तीन महिन्यांतच प्राथमिक स्वरूपातील काम पूर्ण केले.

पुढील कामासाठी निधी आणून वर्षानुवर्षांपासून रखडलेला पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ते नक्की सोडवतील, असा विश्वास वहाडणेंनी व्यक्त केला.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24