अहमदनगर जिल्ह्यातील आजचे कोरोना न्यूज अपडेट्स

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर :- आज अहमदनगर जिल्ह्यातील ४१ पैकी २४ व्यक्तींच्या घशातील स्त्राव चाचणीचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

यात, जामखेड येथील १६, अहमदनगर शहर व तालुका ०५, संगमनेर ०१, अकोले ०१ आणि आष्टी तालुक्यातील ०१ जणांचे अहवाल निगेटिव्ह असून अद्याप १७ अहवालाची प्रतीक्षा आहे.

दरम्यान, जिल्हा रुग्णालयाच्या वतीने आतापर्यंत १४८३ व्यक्तींचे स्त्राव नमुने चाचणीसाठी पाठविण्यात आले होते.

त्यातील १३८१ व्यक्तींचे स्त्राव चाचणी अहवाल निगेटीव आले आहेत. तर एकूण कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ४० झाली आहे.

यापैकी दोघा रुग्णांचा मृत्यू झाला असून २४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

सध्या ६९० व्यक्तींना त्यांच्या घरीच देखरेखीखाली ठेवण्यात आले असून १२२ जणांना हॉस्पिटल मध्ये देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.

यात जिल्हा रुग्णालयात १०२, एआयएमएस मध्ये ०६ व्यक्ती उपचार घेत आहेत. बूथ हॉस्पिटल मध्ये १४ कोरोना बाधीत रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com® 

अहमदनगर लाईव्ह 24