अहमदनगर Live24 ,5 जून 2020 : संगमनेर तालुक्यातील निळवंडे गावी आरोपी मच्छिंद्र संजय मेंगाळ याने एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर, ‘मी तुझ्यावर प्रेम करतो,’ असे सांगून शेतात नेऊन वारंवार अतिप्रसंग करून तिला पाच महिन्यांची गर्भवती ठेवली.
या आरोपावरून अकोले पोलिस ठाण्यात आरोपी मच्छिंद्र संजय मेंगाळ याच्या विरोधात पास्कोसह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलिस ठाण्यात पीडित मुलीने फिर्याद दाखल केली.
मे २०१९ ते २० मे २०२० या काळात आरोपी मच्छिंद्र संजय मेंगाळ याने अल्पवयीन मुलीशी मैत्री केली. त्याचा गैरफायदा घेत या तरुणाने शेरणखेल येथील एका शेतात पीडित मुलीला ‘मी तुझ्यावर खूप प्रेम करतो’, असे म्हणत तिच्यावर अत्याचार केला.
हा प्रकार येथेच थांबला नाही, तर तो वारंवार होत राहिला. दरम्यान, तीन ते चार महिन्यांनंतर मुुुुलीच्या घरच्यांनी मुलीची सोनोग्राफी तपासणी केल्यानंतर लक्षात आले की, ही मुलगी पाच महिन्यांची गरोदर आहे.
त्यानंतर झाला प्रकार पीडित मुलीने आपल्या आईस सांगितला. त्यामुळे पीडिताच्या घरच्यांनी थेेट अकोले पोलिस ठाणे गाठले. घडला प्रकार मुलीच्या पालकांनी थेट पोलिस निरीक्षक अरविंद जोंधळे यांना कथन केला.
त्यानंतर जोंधळे यांनी आरोपीवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. या प्रकरणी मच्छिंद्र संजय मेंगाळ याच्यावर पास्कोसह बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews