श्रीरामपूर :- शहरातील गोपीनाथनगर भागामध्ये गव्हाची पोती घेऊन जाणारी रेल्वे बोगी लुटल्याची घटना काल दुपारी घडली आहे.
रेल्वे मालगाडी चितळीच्या बाजूने श्रीरामपूर (बेलापूर) रेल्वेस्थानकावर येत असताना ती मालगाडी अचानक शहरातील गोपीनाथनगर भागामध्ये थांबली.
त्याचाच फायदा घेऊन परिसरातील काही जणांनी मालगाडीच्या एका बोगीचे कुलूप तोडून त्यातील गव्हाचे पोते लुटले.
घटनेची माहिती समजताच रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिसराची पाहणी केली व चौकशीसाठी दोन जणांना ताब्यात घेतल्याचे समजते.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®