जिल्ह्यातील ‘या’ ठिकाणी ट्रक चालकाचा खून !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,7 सप्टेंबर 2020 :-  राहाता तालुक्यातील निर्मळपिंप्री शिवारातील टोलनाक्यावर मध्यप्रदेशचा मालट्रक चालकांना बेदम मारहाण करण्यात आली.

यात एका चालकाचा मृत्यू झाला असून एक जखमी आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, रविवार दि.६ रोजी रात्री 10.15 ते 10.30 वाजण्याच्या सुमारास लूट करण्यात आली.

सहा ते सात जणांनी तलवार, चाकू आणि लाकडी दांडक्याचा वापर करून हि लूट केली. लुटारू जवळच्या शेतात पसार झाले.

या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली असून आरोपींचा कसून शोध घेतला जात आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24