अहमदनगर Live24 टीम,8 ऑक्टोबर 2020 :- जनावरांची बाजारात खरेदी-विक्री कशी होते याची पद्धत सर्वश्रुत आहे. बऱ्याचदा हातावर रुमाल टाकून या जनावरांची सौदेबाजी करण्यात येते.
परंतु आता या जुनाट पद्धतीने शेतकऱ्यांना अंधारात ठवून त्यांना फसवून व्यवहार होतात त्यामुळे हातावर रुमाल टाकून करण्यात येणारी सौदेबाजीची पद्धत बंद करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ.अशोकराव ढगे यांनी राज्याचे कृषी मंत्री दादाजी भुसे यांचेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
तसेच या निवेदनाची प्रत जिल्हाधिकाऱ्यांना ही पाठविण्यात आली असून जिल्हाधिकारी कार्यलय पातळीवर परिपत्रक काढून आणि सक्षम अधिकाऱ्यांची नेमणूक करून या रुमाल पध्दतीवर बंदी आणणे बाबद कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे.
निवेदनात डॉ.ढगे यांनी म्हंटले आहे की, महाराष्ट्र राज्यामध्ये गाई, म्हैस, बैल इत्यादी जनावरांच्या खरेदी-विक्रीसाठी अतिशय जुनाट असलेली रुमाल पद्धत वापरली जात आहे. हातावर रुमाल टाकून जनावरांचा सौदा करणे ही अत्यंत भयंकर आणि शेतकऱ्यांना अंधारात ठेवणारी आहे.
हातावर रूमाल टाकून दलाल जनावरांचा सौदा करतात त्यामुळे शेतकऱ्यांना जनावरांची नक्की किंमत किती हे कळत नाही. शेतकऱ्यांना अंधारात ठेऊन सौदा केला जात असल्याने शेतकऱ्यांची फसवणूक होते. त्यामुळे या रुमाल पध्दतीवर तातडीने बंदी आणावी अशी मागणी डॉ.ढगे यांनी केली आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved