अहमदनगर Live24 टीम,25 सप्टेंबर 2020 :- जिल्ह्यात गुरूवारी आणखी बारा जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आणखी ७७८ पाॅझिटिव्ह रुग्ण आढळले. नगर जिल्ह्याची वाटचाल आता ४० हजारांच्या टप्प्याकडे सुरू झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या कोविड चाचणी प्रयोगशाळेत १३१, खासगी प्रयोगशाळेत २९० आणि अँटीजेन चाचणीत ३५७ बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या कोविड चाचणी प्रयोगशाळेत मनपा हद्दीतील ७०,
संगमनेर १, राहाता ७, पाथर्डी १, श्रीरामपूर २०, कॅन्टोन्मेंट ५, नेवासे ८, श्रीगोंदे ९, पारनेर २, राहुरी २, कोपरगाव १, जामखेड ५ रुग्णांचा समावेश आहे. खासगी प्रयोगशाळेत मनपा १०७, संगमनेर ४,
राहाता ७, पाथर्डी ४, नगर ग्रामीण ७, श्रीरामपूर ३७, कॅन्टोन्मेंट १४, नेवासे १०, श्रीगोंदे ७, पारनेर १७, अकोले ३१, राहुरी ९, शेवगाव १३, कोपरगाव १२, जामखेड १० आणि कर्जतच्या १ रुग्णाचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत मनपा २४, संगमनेर १६, राहाता २८, पाथर्डी १३, नगर ग्रामीण २०, श्रीरामपूर ९, कॅन्टोन्मेंट २१, नेवासे १०, श्रीगोंदे २३, पारनेर ५२, अकोले २३, राहुरी ३२, शेवगाव ३६, कोपरगाव २५,
जामखेड २४ आणि कर्जतच्या १ रुग्णाचा समावेश आहे. दरम्यान, जिल्ह्यात आणखी १२ जणांचा मृत्यू झाला असून बळींची संख्या आता ६५६ झाली आहे. बाधित रुग्णांची संख्या ३९ हजार ८६० झाली आहे. सध्या ४ हजार ४३५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved