नगरपरिषदेच्या दुर्लक्षाने दोन कोटींचा खर्च पाण्यात

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम ,28 जून 2020 :  कोपरगाव नगरपरिषदेने भाजीपाला विक्रीसाठी शहरातील बाजारतळ परिसरात जवळपास दोन कोटी रुपये खर्च करून अद्ययावत शेडसह आठवडे बाजार ओट्यांची निर्मिती केली.

मात्र या ओट्याच्या तळावर पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचत असल्याने विक्रेत्याना बसण्यास अडचणी यात आहेत. परिणामी हा खर्च पाण्यात गेला आहे.

कोपरगाव नगरपरिषदेने भाजीपाला विक्रीसाठी शहरातील बाजारतळ परिसरात ३२ गुंठ्यात अद्ययावत शेडसह आठवडे बाजार ओट्यांची निर्मिती केली. या कामासाठी १ कोटी ८९ लाख रुपये खर्च केला गेला.

ओट्यांना आद्यक्रांतिकारक राघोजी भांगरे यांचे नाव दिले. मात्र ओट्याच्या तळावर पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचत आहे. गेली अनेक महिने हे ओटे धूळखात पडून होते. परंतु कोरोनामुळे हे बाजार ओटे सुरु करण्यात आले आहे.

सद्यस्थितीत पावसाळा सुरु झाल्याने या सर्वच बाजार ओट्याच्या दोन शेडच्या मधोमध सिमेंट कॉन्क्रिट केले आहे. लहान मुले अक्षरश: जलतरण तलावासारखा आनंद घेत आहेत. त्यामुळे शासनाचे कोट्यवधी रुपये खर्च करून विकास कामे केली जातात.

कामे सुरु असताना कामावर व्यवस्थित लक्ष न दिल्याने कामे निकृष्ट होतात. आणि त्याच झालेल्या कामावर दुरुस्तीसाठी पुन्हा जनतेच्या खिशातील करापोटी वसूल केलेला पैसा खर्च करायचा ही कोणती व्यवस्था ?, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24