कोरोनामुळे जिल्ह्यातील दोघांचा मृत्यू,दिवसभरात नवे १९२ पॉझिटिव्ह रुग्ण

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 8 नोव्हेंबर 2020 :-नगर शहर व जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी दोन जणांचा मृत्यू झाला असून दिवसभरात नवे १९२ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

नगर शहर व जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळी सहा वाजल्यापासून शनिवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत रुग्ण संख्येत २५८ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १३९३ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ४३, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ३० आणि अँटीजेन चाचणीत ११९ रुग्ण बाधित आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १६, अकोले ७, नगर ग्रामीण ७, पारनेर १, पाथर्डी १२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा ११, जामखेड १, नगर ग्रामीण ४, राहाता ५, राहुरी ३, संगमनेर ५,श्रीरामपूर १ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत ११९ जण बाधित आढळून आले. यात मनपा ७, अकोले ११, जामखेड १, कर्जत ५, कोपरगाव १, नगर ग्रामीण १३, नेवासे ८, पारनेर ८, पाथर्डी २१, राहाता ८, राहुरी २, संगमनेर १९, शेवगाव १०, श्रीगोंदे २, श्रीरामपूर ३ यांचा समावेश आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24