अहमदनगर Live24 ,25 मे 2020 :- कोपरगाव तालुक्यातील जेऊरकुंभारी हद्दीत सुरू असलेल्या समृद्धी महामार्गाच्या कामावर उच्च दाबाच्या विद्युत वाहक तारेला दोन अल्पवयीन चिकटल्याने त्यांचा जागेवरच दुर्दैवी अंत झाला. ही रविवारी ( दि . २४ मे ) रोजी सायंकाळी सात वाजता घडली.
जेऊरकुंभारी येथील दोघी अल्पवयीन मुली गाडी शिकण्यासाठी समृद्धी महामार्गाच्या काम सुरू असलेल्या ठिकाणी आल्या होत्या. त्यांच्याबरोबर धनश्री गणेश पालवे ( वय ८ ), बेट येथील प्रतीज्ञा नितीन आव्हाड ( वय ७ ) या दोघी आल्या होत्या.
खेळता खेळता त्या जवळच असलेल्या उच्च दाबाच्या विद्युत तारेला एकीचा स्पर्श झाला . तिच्यासोबत असलेल्या मैत्रिणीने तिला वाचविण्याचा प्रयत्न केला असता तीदेखील विद्युत तारेला चिटकल्याने दोघींचा जागीच अंत झाला.
घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलीस आणि वीज वितरणचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. दोन्ही मुलींचे मृतदेह ताब्यात घेऊन ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews
This Story First Publish on Ahmednagarlive24.com