अहमदनगर Live24 ,22 मे 2020 :- राहुरी तालुक्यात एकाच दिवशी आत्महत्येच्या दोन घटना घडल्या. पहिली घटना बुधवारी रात्री साडेदहा वाजता बारागाव नांदूर येथे, तर दुसरी घटना देवळाली प्रवरा येथे बुधवारी रात्री दहाच्या सुमारास घडली.
बारागाव नांदूर येथील विजय अशोक बर्डे (वय २१) या तरुणाने गावातील संत तुकाराम विद्यालयाच्या पाठीमागे असलेल्या लिंबाच्या झाडाला दोर अडकवून गळफास घेतला.
या घटनेची खबर मिळताच जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे, ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर आघाव, निवृत्ती देशमुख यांनी घटनास्थळी जाऊन विजयला राहुरीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यास मदतकार्य केले.
दरम्यान, उपचारापूर्वीच विजयची प्राणज्योत मालवल्याचे डाॅक्टरांनी सांगितले. गुरुवारी दुपारी राहुरी येथे शवविच्छेदनानंतर विजयचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.
दुसरी घटना बुधवारी रात्री १० वाजता देवळाली प्रवरा येथे घडली. आकाश अशोक भिंगारे (वय ३२, रा. देवळाली प्रवरा) याने घरातील छताच्या लोखंडी अॅँगलला दोर अडकवून गळफास घेतला.
गुरुवारी दुपारी राहुरी येथे शवविच्छेदनानंतर आकाशचा मृतदेह नातेवाईकाच्या ताब्यात देण्यात आला. आत्महत्येच्या या दोन्ही घटना मागील नेमके कारण समजू शकले नाही.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com