Ahmednagar Breaking : ट्रक व कंटेनरच्या अपघातात दोन ठार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar Breaking : अहमदनगर संभाजीनगर महामार्गावरील घोडेगाव येथील मार्केट यार्डसमोर शुक्रवार दिनांक १ सप्टेंबर रोजी सकाळी पाच वाजता ट्रक व कंटेनरचा अपघात होऊन दोन जण जागीच ठार झाले आहेत.

संजय लक्ष्मण घुले ( वय ३४, राहणार शेकटे, तालुका पाथर्डी) यांनी सोनई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली, की संभाजीनगर होऊन अहमदनगरकडे चाललेला लेलँड कंटेनर ट्रकचा (नंबर एमएच ४३ वाय ५०११) चालक आदिनाथ भीमराव वने (पाटण, तालुका आष्टी, जिल्हा बीड) याने अविचाराने भरगाव वेगात वाहन चालवून रोडच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून

कंटेनर रोडच्या उजव्या बाजूला समोरून येणाऱ्या लेनवरील रोड दुभागाच्या मधून घालून अहमदनगरकडून समोरून येणारा टाटा कंपनीचा ट्रक नंबर एमएच १४ केक्यू १५९९ यास समोरून जोराचे धडक देऊन अपघात करून अपघातामध्ये ट्रकमधील चालक मिराहुसेन खुदबद्दीन मुजावर ( राहणार जत, जिल्हा सांगली) याच्या

व स्वतःच्या मृत्यू तसेच दोन्ही वाहनाचे नुकसानीस कारणीभूत झाला. या फिर्यादीवरून सोनई पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ४१२ / २०२३ नुसार भादवि कलम ३०४(अ), २७९, ३३७, ३३८, ४२७ मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल अडकित्ते पुढील तपास करत आहेत.