अहमदनगर ब्रेकिंग : कंटेनरच्या धडकेत दुचाकीवरील दोघे ठार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmadnagar Braking : तालुक्यातील येसगाव पाट येथे नगर- मनमाड महामार्गावर गुरुवार सायंकाळी ६.१५ वाजेच्या सुमारास राजस्थान येथील कंटेनरने (क्र. आरजे ४७ जीए ५७२७) दुचाकीला (क्र. एमएच १५ डीव्ही ९४१४) दिलेल्या धडकेत दुचाकीवरील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

याबाबत सूत्रांनी माहिती दिली, की दिगंबर सहादू जेजूरकर (वय- ५५) व कडूभाऊ लक्ष्मण क्षीरसागर (वय ४५) असे मयत व्यक्तींची नावे असून दोघे येवला तालुक्यातील उंदिरवाडी येथील रहिवासी आहेत.

दोघे वैयक्तिक कामानिमित्त कोपरगावात आले होते व आपले काम आटोपून ते आपल्या घरी परतत असताना त्यांच्यावर काळाने हा घाला घातला. ऐन रक्षाबंधनाच्या सणाला ही दुर्दैवी घटना घडल्याने तालुक्यातील एकच हळहळ व्यक्त होत आहे.

अपघातानंतर घटनास्थळावरून कंटेनरचालक तत्काळ फरार झाला. त्या कंटेनरच्या क्लिनरला सुषमा खिलारी व गणेश चव्हाण यांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. कंटेनर बंगलोरहून गुडगावकडे जात असताना हा भीषण अपघात घडला आहे.

मृतदेह अमित खोकले यांच्या रुग्णवाहिकेतून ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी नेण्यात आले. घटनेची माहिती तालुका पोलिसांना मिळताच तालुका पोलिसांनी घटनास्थळी व ग्रामीण रुग्णालयात धाव घेत घटनास्थळाचा व मृतदेहाचा पंचनामा केला. असून गुन्हा दाखल केला आहे.