कार ओढ्यात पलटी होऊन दोघे जखमी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

श्रीरामपूर : श्रीरामपूर बेलापूर रस्त्यावरील नरसळी गावाच्या पुढे असलेल्या ओढ्यात सोमवारी दुपारी स्विफ्ट गाडी पलटी होऊन कारमधील व महिला व पुरुष जखमी झाल्याची घटना घडली आहे.

या रस्त्यावर एम एच १५ सिटी ५०२४ या क्रमांकाची स्विफ्ट कंपनीची कार ओढ्यात पलटी झाली. गाडीचा टायर पंकचर झाल्याने भरधाव वेगात पलटी झाली असावी असा अंदाज व्यक्त केला जात होता.

या कारमधील एक महिला व पुरुष दोघेही जखमी झाले असून त्यांना नागरिकांनी रुग्णालयात नेले होते. जखमींची नावे मात्र समजू शकली नाही.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24