अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2021 :- शिर्डीलगत असलेल्या निघोज येथील साईपालखी निवारामध्ये मुंबई येथील सात साईभक्त थांबले होते. हे कुटुंब सकाळी लिफ्टमधून जात असताना लिफ्टमध्ये तांत्रिक दोष निर्माण झाला. व यामुळे झालेल्या अपघातात 02 महिला जखमी तर 05 जण किरकोळ जखमी झाले.
क्षमते पेक्षा अधिक लोकांनी लिफ्ट वापर केल्यामुळे हा अपघात झाला असावा,अशी शंका कामगारांनी व्यक्त केली हेमलता म्हात्रे व दिपाली म्हात्रे या महिलांना जास्त मार लागल्याने शिर्डी येथील साईबाबा सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
याबाबत हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रीतम वडगावे यांना विचारले असता सदरच्या घटनेत दोन महिला जखमी झाल्या होत्या असे सांगत उपचार झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आल्याचे सांगितले.
कुठल्याही इमारतीत नवीन लिफ्ट बसवल्यानंतर तिच्या देखभालीची जबाबदारी संबंधित कंपनीचे असते. करार संपल्यानंतर प्रत्येक वर्षात एकदा देखभाल व दुरुस्ती करून त्याबाबतचे पत्र घेणे संबंधित हॉटेल चालकांवर बंधनकारक असते. मात्र याकडे गांभिर्याने बघितले जात नसल्याने असे अपघात होत आहेत.
दरम्यान साईबाबा संस्थानच्या हॉस्पिटलने अपघाताची खबर शिर्डी पोलिसांना दिली असून या घटनेची नोंद घेतली असल्याचे पोलिसांनी सांगितले.