ब्रेकिंग

Ahmednagar News : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अहमदनगरमध्ये दोघांच्या आत्महत्या ! जिल्ह्यात खळबळ

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : आरक्षणासाठी मृत्युला कवटाळण्याचे लोण अहमदनगर जिल्ह्यातही पसरायला लागले आहे. काल मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्ह्यातील दोघा जणांनी आत्महत्या केल्या आहेत.

एकजण संगमनेर तालुक्यातील झोळे येथील तर दुसरा नेवासा तालुक्यातील खरवंडी येथील आहे. या आत्महत्यांमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे

आम्ही जातो आमच्या गावा, एक मराठा लाख मराठा, आम्हाला आरक्षण नसल्यामुळे आपण फाशी घेत आहे. कोणाला जबाबदार धरू नये. आपला लाडका सागर मराठा अशी चिठ्ठी लिहून मराठा आरक्षणासाठी २५ वर्षीय युवकाने राहत्या घराच्या मागील शेडमध्ये गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपविल्याची घटना काल मंगळवारी पहाटे तालुक्यातील झोळे गावात घडली.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सागर भाऊसाहेब वाळे (वय २५) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. सागरने पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले असून तो संगमनेर शहरातील एका खासगी उद्योग समूहात नोकरी करत होता. काल पहाटे त्याने घरामागे असणाऱ्या पत्र्याच्या शेडमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.

त्याच्या घरातील व्यक्ती झोपेतून उठल्यानंतर शेडमध्ये त्यांना सागर याचा मृतदेह आढळला. त्याने लिहिलेली एक चिठ्ठी या ठिकाणी सापडली. ‘आम्ही जातो आमच्या गावा एक मराठा लाख मराठा, आम्हाला आरक्षण नसल्यामुळे मी फाशी घेत आहे. कोणाला जबाबदार धरू नये. आपला लाडका सागर मराठा,’ असा उल्लेख चिठ्ठीत केला असल्याचे दिसून आले.

सागर याने आत्महत्या केली असल्याची माहिती समजताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली. या घटनेची माहिती संगमनेर तालुका पोलीस ठाण्याला कळविण्यात आली.

त्यानंतर तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक देविदास विदास दमणे हे आपल्या सहकारी कर्मचान्यांसह त्वरित घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी सागर याचा मृतदेह खाली उतरवून शवविच्छेनासाठी संगमनेर नगरपालिकेच्या कॉटेज हॉस्पिटलमध्ये पाठविला. पोलिसांनी पंचनामा करून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

दुसऱ्या घटनेत अंतरवाली सराटी येथील मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी नेवासा तालुक्यातील खरवंडी येथील दत्तात्रेय अभिमन्यू भोगे (वय ४५) यांनी आत्महत्या केली आहे. ‘जरांगे पाटील यांच्या उपोषणास पाठिंबा देऊन मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी आत्महत्या करत आहे, अशी चिठ्ठी त्यांनी लिहून ठेवली आहे.

सोनई खरवंडी रस्त्यावर रविवारी भोगे यांनी आपली जीवन यात्रा संपवली. भोगे यांनी लिहलेल्या चिठ्ठीमध्ये म्हटले आहे की, ‘मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून व मराठा समाजासाठी काही तरी उपयोगी सामान्य माता काली का ही कमान दिले पाहिजे.

जरांगे यांच्या उपोषणास पाठिंबा व आरक्षण मिळावे. आमचे मराठा बांधव सुखी व्हावे म्हणून आरक्षण मिळवण्यासाठी देह अर्पण करून आरक्षणाला पाठिबा देत आहे. याबाबत शिंगणापूर पोलिसांनी पंचनामा करुन कारवाईसाठी चिनामा करुन पुढील चिठ्ठी ताब्यात घेतली आहे.

मराठा आरक्षणासाठी राज्यभर आंदोलन दालन सुरू असताना आरक्षणाच्या मागणीसाठी “आत्महत्येचे पाऊल काही युवकांनी आत्मह उचलले आहे. सागर याच्यावर काल साडेअकरा वाजेच्या सुमारास झोळे येथे शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office