ब्रेकिंग

दुचाकीवरून दोन चोरटे आले आणि साडेचार लाखांची बॅग घेऊन गेले

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 03 जानेवारी 2022 :- घरासमोर उभी केलेल्या दुचाकीच्या डिक्कीतून साडेचार लाख रूपये असलेली बॅग दोघा चोरट्यांनी लांबविली. सोमवारी दुपारी सारसनगर परिसरात ही घटना घडली आहे.(Ahmednagar Crime)

चोरटे दुचाकीवरून बॅग घेवुन जाताना सीसीटीव्हीत कैद झाले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखा, भिंगार पोलिसांनी घटनास्थळी भेट देत तपासाची चक्रे फिरवली.

दरम्यान याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अतुल शिवाजी कोळेकर (रा. सारसनगर) यांनी फिर्याद दिली आहे. कोळेकर यांनी सोमवारी दुपारी मार्केट यार्ड परिसरातील मर्चंट बँकेतून साडेचार लाख रूपयांची रक्कम काढली होती.

कोळेकर यांना ती रक्कम त्यांचे मालक शिवाजी पाटील यांना द्यायची होती. कोळेकर यांनी बँकेतून काढलेली रक्कम दुचाकीच्या डिक्कीत ठेवून ते दुचाकी घेवुन सारसनगर येथील घरी गेले.

दुचाकी घरासमोर उभी करून ते जेवण करण्यासाठी घरात गेले. त्याचवेळी चोरट्यांनी संधी साधून सदरची रक्कम असलेली बॅग लांबविली. जेवण झाल्यानंतर कोळेकर दुचाकी घेवुन मालकाकडे गेले.

त्यावेळी दुचाकीच्या डिक्कीत रक्कम नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. रक्कम चोरीला गेल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी त्या परिसरातील सीसीटीव्ही ताब्यात घेत तपास सुरू केला आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office