पिकअपच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 26 ऑगस्ट 2020 :-   शेवगाव- पांढरीपुल रस्त्यावरील मळेगाव शिवारात अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

सुखदेव यादव गटकळ (वय ५५, रा. तेलकुडगाव, ता. नेवासे) असे मृताचे नाव असून मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली.

तेलकुडगाव येथून शेवगावकडे दुचाकीवरून जात असताना मळेगाव येथील चौफुलीवर आले असता शेवगावहून नगरकडे जाणाऱ्या भरधाव पिकअपने धडक दिली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

स्थानिक ग्रामस्थांनी नातेवाईकांना व पोलिसाना खबर दिली. मात्र तोपर्यंत पिकअप घेऊन वाहनचालक पसार झाला होता. पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुध्द गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलिस कॉन्स्टेबल राजू केदार करत आहेत.

 

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24