अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- संगमनेर तालुक्यातील निळवंडे परिसरात राहणाऱ्या दोन विवाहित तरुणी अशा त्यांच्या घरासमोर उभ्या असताना तेथे चौघे आरोपी आले व तुम्ही आमची जमीन आमच्या नावावर करुन द्या, असे म्हणाले , तेव्हा दोघी जावा आमच्या नावावर जमीन नाही , आम्ही कशी नावावर करून देवू , तुम्ही येथून निघून जा , असे म्हटल्याचा राग आल्याने या दोघींना मारहाण करून शिवीगाळ केली.
दोघींना धरुन त्यांचे कपडे फाडून आरोपीने लज्जा उत्पन्न होईल , असे वर्तन करुन विनयभंग केला . दोघा तरुणींची सासू सोडविण्यास आली असता त्यांना पण मारहाण करुन विनयभंग करण्यात आला . यात एका तरुणीची पोत तुटून हरवली . काल ९ वाजता हा प्रकार घडला.
पिडीत २३ वर्षाच्या विवाहित तरुणीने संगमनेर तालुका पोलिसांत फिर्याद दिल्यावरुन आरोपी रामनाथ विजय उर्किडे , पुनम विजय उर्किडे , विजय बाबुराव उर्किडे , अलका विजय उर्किडे , सर्व रा . निळवंडे , ता . संगमनेर यांच्याविरुद्ध भादवि कलम ३५४ , ३२३ , ५०४ , ५०६ , ३४ प्रमाणे विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.