ट्रक-बोलेरो अपघातात दोन कामगारांचा मृत्यू

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :- श्रीगोंदे | घारगाव येथील निलगिरी हॉटेलजवळ शनिवारी रात्री ११ च्या सुमारास ट्रक व बोलेरो यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात माथाडी कामगार मंडळाच्या २ कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला.

माथाडी कामगार मंडळाची बोलेरो (एमएच १७ एएन ००५२) राशीनहून श्रीगोंदेमार्गे नगर येथे जात होती. नगरहून दौंडला जाणाऱ्या एमएच १२ जेएस ९४४४ या ट्रकची धडक झाली.

बोलेरो ट्रकखाली दाबली गेली. या अपघातात माथाडी कामगार मंडळाचे निरीक्षक प्रभाकर निवृत्ती लोंढे (वय ५७) व गाडीचा चालक अशोक पुंजबा औटी (वय ४८)

यांचा जागीच मृत्यू झाला. बेलवंडीचे पोलिस निरीक्षक अरविंद माने व सहायक निरीक्षक प्रकाश बोराडे यांनी मृतदेह बाहेर काढले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24