अहमदनगर Live24 ,31 मे 2020 :- मुंबईवरून आलेला तरुण आईने घरा बाहेर ठेवला आणि दुर्दैवाने त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. हा नेवासे तालुक्यातील सातवा कोरोना रुग्ण आहे.
तालुक्यातील कारेगाव येथील भांडुपला वॉचमन म्हणून काम करत असलेला तरुण भानसहिवरा गावाच्या आठ जणांसोबत शुक्रवारी (२९ मे) पहाटे घरी आला.
त्याची खालावलेली प्रकृती पाहून आईने देखील त्याला घराबाहेरच ठेवले. त्याला संस्थेत क्वारंटाइन करण्यात आले. त्यावेळी कोणतेही लक्षण दिसत नव्हते.
परंतु रात्री आरोग्य अधिकाऱ्यांच्या लक्षात आले की त्याला ताप आला आहे. त्यामुळे त्याला रात्रीच नगरला हलवले. रात्री दहा वाजता त्याची तपासणी संपल्यानंतर शनिवारी सायंकाळी सात वाजता या रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह सापडला.
त्यामुळे पुन्हा एकदा बाहेरून आलेल्यांनी नेवासाच्या खेड्यांमध्ये कोरोना पोहोचवल्याचे दिसून येत आहे तालुक्यातील भानासहिवरा येथून स्कार्पिओ घेऊन कार मालक व चालक हे भांडुपला गेले होते.
त्यांच्याबरोबर भानसहिवरेचे सहा आणि कारेगावचा एक गावाकडे आले त्यात इतर जे सहाजण आहेत ते पाहुणे आलेले आहेत. त्यांना स्थानिक नेत्यांच्या दडपणामुळे पाहुण्यांनी जिल्हा परिषद शाळेमध्ये ठेवलेले होते तर कारेगाव चा हा रुग्ण थेट घरी गेला होता.
तेथे त्याला आईने बाहेर ठेवले होते. आरोग्य पथकाला समजल्यावर आरोग्य पथक थेट कारेगाव गेले त्यांनी ९ जणांना बेलेकर संस्थेमध्ये क्वारंटाइन केले.
आता यातील एक जण जण पॉझिटिव्ह सापडल्यामुळे या आठही जणांना त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान जागेतील क्वारंटाइन सेंटरमध्ये हलवले आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews