दुर्दैवी ! घराची भिंत कोसळून एकजण ठार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2021 :-श्रीरामपूर तालुक्यातील उंदिरगाव येथील प्रगतिशील शेतकरी व ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब नारायण ताके यांच्या अंगावर घराची भिंत कोसळल्याने त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान हि दुर्दैवी घटना शुक्रवारी दुपारी 3 वाजता घडली असल्याचे समजते आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, घराच्या दुरूस्तीचे काम सुरू असताना भिंत त्यांच्या अंगावर पडल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला.

दरम्यान त्यांना तातडीने स्थानिक दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झा होता. त्यांच्या पश्‍चात पत्नी, मुलगा व विवाहीत मुलगी असा परीवार आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24