Union budget 2020 Live : आता आई होण्याचं वयही ठरणार : निर्मला सीतारमण

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन आज (शनिवार 1 फेब्रुवारी) अर्थसंकल्प सादर करणार आहेत. 2020-21 या आर्थिक वर्षासाठीच्या बजेटचं वाचन सकाळी 11 वाजता सुरु होईल.

कोणत्या वस्तू महागणार आणि कशाचे दर स्वस्त होणार? इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? सीतारमन यांच्या पोतडीतून रेल्वेसाठी काय मिळणार? याकडे सर्वसामान्यांचे डोळे लागले आहेत.

Budget 2020 Live

 

महिलांशी निगडित विशेष उपक्रमांसाठी 28600 कोटींची तरतूद

निर्मला सीतारमण म्हणाल्या, “आधी मुलींच्या लग्नाचं वय वाढवण्यात आलं होतं. आता आमचं सरकार मुलींच्या आई होण्याच्या वयावरही विचार करत आहे. यासाठी एका ‘टास्क फोर्स’ची स्थापना केली जाईल. ही टास्क फोर्स 6 महिन्यांमध्ये या विषयावरील आपला अहवाल सादर करेल.”

यामध्ये निर्मला सीतारमण यांनी महिलांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. मुलींच्या आई होण्याच्या वयोमर्यादेवरही विचार करणार असल्याचं अर्थमंत्री सीतारमण यांनी स्पष्ट केलं

केंद्रीय कॅबिनेट सचिव राजीव गौबा संसदेत दाखल

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांची घेतली भेट

मंत्रालयात पोहोचल्या निर्मला सीतारामन

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24