अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- गुरुग्रामच्या सेक्टर ५६ मध्ये एका सोसायटीत आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर एका व्यक्तीने अनैसर्गिक सेक्स करत लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे
याबाबत सविस्तर माहिती अशी कि, पीडित विद्यार्थी हा संध्याकाळी फेरफटका मारण्यासाठी आपल्या इमारतीच्या खालच्या परिसरात गेलेला असतानाच त्याच्यावर बलात्कार करण्यात आला.
पीडित विद्यार्थी हा पाचव्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये राहत आहे. यावेळी इमारतीचे सुरक्षा रक्षक हीटरजवळ शेकत बसले होते. त्याचवेळी पीडित मुलगा देखील शेकण्यासाठीत त्यांच्या इथे गेला.
आरोपी अमित कुमार हा देखील त्याच ठिकाणी आला आणि या सगळ्यांसोबत बसून राहिला. आरोपी हा त्याच इमारतीत आठव्या मजल्यावर राहतो.
आरोपी लिफ्टने तिसऱ्या मजल्यापर्यंत पोहचला आणि त्याने मुलाला लिफ्टमध्ये ओढून घेतलं. त्यानंतर त्याने मुलाला आपल्या आठव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये नेऊन त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला.’
पीडित मुलाने आरोपीच्या तावडीतून सुटका केली आणि तो घरी परतला. यानंतर त्याने संपूर्ण प्रकाराबाबत आपल्या आई-वडिलांना माहिती दिली. त्यानंतर पालकांनी पोलीस स्थानकात जाऊन आरोपीविरुद्ध तक्रार नोंदवली.
पोलिसांनी आरोपी अमितकुमार विरुद्ध बलात्काराचा गुन्हा देखील दाखल केला आहे. सध्या पोलीस आरोपीचा कसून शोध घेत आहेत.