अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयाने यूपी येथील उन्नाव चे आमदार कुलदीप सिंग सेंगर ला कलम 120b कट रचणे, 363 अपहरण, 366 लग्नासाठी महिलेचे अपहरण आणि उत्पीडन, 376 बलात्कार, आणि इतरही अनेक कलमानुसार पी ओ सी एस ओ नुसार दोषी ठरवले आहे.
तर चला बघूया या सर्व कलमानुसार दोषी आढळून आलेल्या विधायक सेंगरला कोणती शिक्षा होऊ शकते. आयपीसी चे कलम 120b नुसार जर कोणी अपराधी असेल तर त्याला काही वर्षांचा कारावास किंवा दंड किंवा दोन्ही होऊ शकते. आयपीसी चे कलम 376 जर कोणी आरोपी या कलमांतर्गत दोषी आढळला तर त्याला कमीत कमी सात वर्षे किंवा जास्तीत जास्त दहा वर्षांची सक्तमजुरीची सजा सुनावली जाऊ शकते.
पोस्को ॲक्ट नुसार जर कुणी दोषी आढळत असेल तर त्याला दहा वर्ष कारावास किंवा आजीवन कारावास देखील होऊ शकतो. आयपीसी चे कलम 363 जर एखादी व्यक्ती या कलमांतर्गत दोषी आढळली तर तिला जास्तीत जास्त दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते.
वरील सर्व कलम सेंगर वर असल्यामुळे सेंगर ला या सर्व शिक्षा होऊ शकतात त्यामुळे सेंगरला आजीवन कारावास होण्याची शक्यता आहे. जून 2017 मध्ये बीजेपी चे आमदार कुलदीप सिंग सेंगरने तिचे अपहरण करून तिच्यासोबत बलात्कार केला होता. यावेळी पीडिता लहान होती. यूपीमधून चार वेळा आमदार राहिलेले सेंगरला 2019 मध्ये बीजेपीमधून काढून टाकण्यात आले आहे.
सेंगरवर एकूण पाच खटले चालू असून त्यातील एकाचा निकाल आला आहे. बाकी खटल्यांची अजूनही चौकशी चालू आहे. ज्यामध्ये पीडितेच्या वडिलांचा कस्टडी मध्ये झालेला मृत्यू. रस्त्याच्या अपघातात तिच्या परिवारातील मृत झालेल्या दोन महिला आणि पीडिते सोबत करण्यात आलेला गॅंग रेप त्यासोबतच तिच्या काका विरोधात दाखल करण्यात आलेली खोटी तक्रार. हे सर्व खटले यामध्ये समाविष्ट आहेत.