Ahmednagar Breaking : अर्बन बँकेचा घोटाळा ३०० कोटींच्या घरात, ‘ती’ रक्कम सुवेंद्र गांधींच्या अकाउंटवर..बरीच धक्कादायक माहिती समोर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar Breaking : अहमदनगर मधील नगर अर्बन बँक घोटाळा प्रकरण राज्यात गाजले. आता या तपासाला अधिक गती मिळाली आहे. या गैरव्यवहाराप्रकरणी आता अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. हा घोटाळा तब्बल ३०० कोटींच्या घरात असल्याचे समोर आली आहे.

फॉरेन्सिक अहवालानुसार बँकेचे संचालक व अधिकाऱ्यांनी संगनमत करून तब्बल २९१ कोटींचा गैरव्यवहार केला असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी न्यायालयात गुरुवारी झालेल्या युक्तिवाद दरम्यान ही माहिती दिली.

बँक गैरव्यवहार प्रकरणी सध्या राजेंद्र शांतीलाल लुणिया (वय ५६, रा. राऊतमळा, कल्याण रोड) व प्रदीप जगन्नाथ पाटील (वय ५५, रा. रेणावीकरनगर, सावेडी) हे दोघे अटकेत आहेत. या दोघांना गुरुवारी येथील जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले.

त्यांना जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.व्ही. सहारे यांनी १५ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी दिली. हे दोघे नगर अर्बन बँकेत शाखा अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांचा या गैख्यवहारात प्रत्यक्ष सहभाग असल्याचे फॉरेन्सिक अहवालात नमूद आहे.

गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने त्यादृष्टीने तपास करायचा आहे. या गैरव्यवहाराच्या रकमेतील काही रकमा अधिकाऱ्यांच्या खात्यावरही वर्ग झालेल्या आहेत, यातील किती रक्कम त्यांनी स्वतः साठी ठेवून घेतली आणि किती दुस-यांच्या खात्यावर वर्ग केली,

ही माहिती मिळणे तपासासाठी आवश्यक आहे. त्यामुळे दोघा आरोपींना १५ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी मिळावी, अशी मागणी तपासी अधिकारी तथा पोलिस उपअधीक्षक हरिश खेडकर यांनी केली.

‘ती’ रक्कम सुवेंद्र गांधीच्या खात्यावर वर्ग

सध्या अटकेत असणारा आरोपी राजेंद लुणिया हा २०१४ मध्ये बँकेचा शाखा अधिकारी असताना सम्यक ट्रेडर्स नावाच्या खात्यातून दि. १ जून २०१४ रोजी २० लाख रुपये स्वतः च्या खात्यात घेतले असल्याचे दिसते.

त्यातील ४४ हजार रुपये त्याने काढले व उर्वरित १९ लाख ५६ हजार रुपये त्याने माजी नगरसेवक सुर्वेद गांधी यांच्या खात्यात ट्रान्सफर केल्याचे तपासात समोर आले आहे. ही रक्कम नंतर विड्रॉल झाली, ती कुणी विड्रॉल केली, हे अद्याप समोर आलेले नाही.

अनेकांचे धाबे दणाणले

सध्या वरिष्ठ अधिकारी आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात आहेत. अनेक संचालक मंडळाचे अनेक कारनामे समोर येणार आहेत. त्यामुळे सध्या अनेक संचालकांचेही धाबे दणाणले आहेत.

तब्बल ३०० कोटींच्या घरात आहे घोटाळा

नगर अर्बन बँकेतील २८ कर्ज प्रकरणात दीडशे कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा दावा राजेंद्र ताराचंद गांधी यांनी तक्रारीत केला होता. त्यावरून कोतपाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. दरम्यान झालेल्या फॉरेंसिन्क ऑडिट नुसार बँकेत २९१ कोटी २५ लाखांचा गैरव्यवहार झाल्याचे समोर आले आहे. अधिक तपास पोलीस करत असून सत्य लवकरच समोर येईल.