ना नफा ना तोटा तत्त्वावर भाजीपाला घरपोहोच

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

पारनेर :- तालुक्यातील निघोज व परिसरात संदीप पाटील फाउंडेशनचे संस्थापक सचिन वराळ व त्यांचे सहकारी ना नफा ना तोटा तत्त्वावर भाजीपाला घरपोहोच करत आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आठवडे बाजार बंद झाल्याने भाजीपाला व इतर वस्तू मिळवण्यासाठी लोकांना कसरत करावी लागत होती. भाजीपाला घेण्यासाठी एसटी बसस्थानक परिसरात जावे लागत होते.

सचिन वराळ व सुनील पवार यांनी यातून मार्ग काढण्यासाठी प्रशासनाशी चर्चा केली. घरपोहोच भाजीपाला ना नफा ना तोटा तत्त्वावर सुरू करण्याचा प्रस्ताव मांडला.

वीस दिवसांपासून ही योजना सुरु आहे. चार ते पाच माणसं असणारे कुटुंब ऑनलाइन किंवा मोबाइलवर ऑर्डर देत असून या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळत आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

अहमदनगर लाईव्ह 24