अहमदनगर Live24 टीम,13 ऑक्टोबर 2020 :-हवामान खात्याकडून जिल्ह्यात 15 ऑक्टोबरपर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यात आजपर्यंत सरासरीच्या 179 टक्के पाऊस झाला असून अजूनही जोरदार पावसाची शक्यता असल्याने प्रशासनाने नदीकाठच्या लोकांना दक्षतेचा इशारा दिला आहे.
यापार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे आवाहन करण्यात आले आहे की, नागरिकांनी स्थानिक प्रशासनाकडून दिल्या जाणार्या सूचनांचे पालन करावे.
नदी, ओढे व नाल्याकाठच्या नागरिकांनी दक्ष रहावे. नदी अथवा ओढे नाल्यांवरील पुलावरुन पाणी वाहत असल्यास पूल ओलांडू नये. पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये, धोकादायक इमारतींमध्ये आश्रय घेवू नये.
आपत्कालिन परिस्थितीत नजीकचे तहसील कार्यालय, पोलिस स्टेशन यांचेशी संपर्क साधावा. तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय,
अहमदनगर येथे टोल फ्री क्रमांक 1077, 0241-2323844/2356940 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी संदीप निचित यांनी केलं आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved