अहमदनगर Live24 ,27 मे 2020 :- कोरोनापाठोपाठ आता टोळधाडीचे संकट येऊ घातले आहे. अमरावती जिल्ह्यात मोसंबी पिकांवर टोळधाडीने आक्रमण केले असून खरीप हंगामात नगरसह राज्यात सर्वत्र टोळधाड येऊ शकते.
टोळधाडीचे संकट थोपवण्याचे नवे आव्हान कृषी विभागापुढे आहे. काही वर्षांपूर्वी पाकिस्तानमध्ये टोळधाडीने थैमान घातले होते. सध्या मध्यप्रदेश व अमरावतीत टोळधाड सक्रिय आहे.
मध्यप्रदेशातून ही टोळधाड नगर जिल्ह्यात प्रवेश करण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी सावध राहणे गरजेचे आहे. याबाबत भारतीय कृषी अनुसंधान परीक्षण केंद्राने कृषी विभागाला सूचना दिल्या आहेत.
टोळधाड म्हणजे संधिपाद संघातील कीटक वर्गाच्या ऑरर्थाप्टेरा (ऋजू पंखी) गणातील अॅक्रिडिटी कुलातील नऊ जातींच्या कीटकांना टोळ म्हणतात.
टोळाचे इंग्रजी भाषेतील ‘लोकस्ट’ हे नाव लॅटिन भाषेतून आले असून त्याचा अर्थ ‘जळालेली जमीन’ असा होतो. टोळधाड येऊन गेल्यावर जमीन जळून गेल्यासारखी दिसते. टोळ जगभर आढळतात.
तिच्यामुळे पिकांचे अतोनात नुकसान होते. त्यांचा रंग पिवळा, तपकिरी, हिरवट वा राखाडी असून त्यावर वेगवेगळ्या रंगांचे ठिपके व रेषा असतात.
ओलसर मातीत मादी ७.५-१५ सेंमी. भोक पाडून ३-६ महिन्यांच्या काळात ३००-५०० अंडी घालते. अंडी एकमेकाला चिकट स्रावाने जोडलेली असून शेंगेप्रमाणे दिसतात.अंड्यांतून १२-१४ दिवसांनी पंखविरहीत पिले बाहेर पडतात.
पिले पाचवेळा कात टाकून चार आठवड्यांनी प्रौढावस्थेत जातात. जीवनचक्र अर्धरूपांतरण पद्धतीचे असून त्यात अंडी, उड्या मारणारी पिले व पंख असलेले टोळ असे टप्पे असतात. काही वेळात टोळधाड पिके फस्त करतात.
हे टोळ संध्याकाळी किंवा रात्री लाखोंच्या संख्येने शेतात उतरतात. हिरवे पीक काही वेळात फस्त करतात. आग लागून गेल्यावर जशी स्थिती असते ती स्थिती जमिनीची होते.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews
This Story First Publish on Ahmednagarlive24.com