अहमदनगर Live24 टीम,5 ऑगस्ट 2020 :- जिल्ह्यातील कोविड हॉस्पिटल मधील उपलब्ध बेडसची संख्या आता एका क्लिकवर कळणार. जिल्हा प्रशासनाने त्यासाठी covidbed.ilovenagar.com हे पोर्टल सुरू केले आहे.
तेथे नागरिकांना सर्वसाधारण वार्ड, आय सी यु कक्षातील उपलब्ध बेड आणि ऑक्सिजन कक्षातील उपलब्ध बेडस यांची माहिती मिळणार आहे.
त्यामुळे रुग्णांना कुठल्या हॉस्पीटल मध्ये बेडस उपलब्ध आहे हे कळल्याने त्यांचा वेळ वाचणार आहे आणि रुग्णाला वेळेत उपचारासाठी दाखल करणे शक्य होणार आहे.
जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी काही दिवसांपूर्वी फेसबूक लाइव्ह कार्यक्रमात असे पोर्टल सुरू करणार असल्याची माहिती दिली होती.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved