अहमदनगर लाईव्ह 24 टीम / लोणी : प्रतिनिधी पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टीट्यूटच्या वतीने पद्मश्री डाॅ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यास यावर्षीचा तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे आणि वसंतदादा शुगर इन्स्टीट्यूटचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत कारखान्याच्या पदाधिकार्यानी या पुरस्काराचा स्विकार केला.
वसंतदादा शुगर इन्स्टीट्यूटच्या वतीने दरवर्षी सहकारी खाखर कारखान्यांनी केलेल्या गुणात्मक कार्याची दखल घेवून पुरस्काराने सन्मानीत करण्यात येते.यावर्षी जाहीर झालेल्या पुरस्कारामध्ये पद्मश्री डाॅ.विखे पाटील सहकारी साखर कारखान्यास विभागीय स्तरावरील उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार दिला गेला.
या पुरस्काराचे वितरण मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते झाले.याप्रसंगी अध्यक्ष शरद पवार यांच्यासह मंत्री जयंत पाटील बाळासाहेब थोरात आ.दिलीप वळसे, आ.अजित पवार विजयसिंह मोहीते पाटील हर्षवर्धन पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
कारखान्याच्या पदाधिकार्यांसह सर्व संचालकांनी या पुरस्काराचा स्विकार केला. माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि चेअरमन खा.डाॅ.सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याच्या संचालक मंडळाने शेतकरी सभासदांचे हीत जोपासत धोरणात्मक निर्णय घॆवून त्याची अंमलबावणी केली.
आतापर्यतचे सर्व गळीत हंगाम यशस्वीपणे पूर्ण केले. सन २०१८-१९ या हंगामाकरिता कारखान्याने १२.५० टक्के साखर उतारा मिळविला यामध्ये मागील दोन वर्षाच्या तुलनेत १.१५ टक्के इतकी वाढही केली.
गाळप क्षमता वापर १०९.१९ टक्के असून यामध्ये ८.४७ टक्क्यांची वाढ तसेच साखर तयार करण्यासाठी बगॅसचा वापर २२.२९ टक्के करण्यात आला.
पदाधिकारी व संचालक मंडाळाच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याच्या तांत्रिक विभागातील अधिकारी कामगारांनी मोठे परिश्रम घेवून हंगाम यशस्वी केल्यामुळेच राज्यस्तरावर कारखान्याचा सन्मान करण्यात आला पदश्री डाॅ विठ्ठलराव विखे पाटील यांनी सहकार चळवळीची पायाभरणी केली.
पद्मभूषण डाॅ.बाळासाहेब विखे पाटील यांनी सहकारातून ग्रामीण विकासाचा मंत्र कृतीत उतरविताना घालून दिलेल्या विचारानेच कारखान्याची वाटचाल सुरू आहे. सर्व संचालक, शेतकरी सभासद, अधिकारी, कामगार याचेही मोलाचे योगदान कारखान्याच्या यशामध्ये असल्याचे खा.डाॅ.विखे पा.यांनी सांगितले.