अहमदनगर :- काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपचे अहमदनगरचे खासदार दिलीप गांधी यांची भेट घेतली. ही भेट कशासाठी होती हे समजलं नसलं तरी नगरमधील नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
विखेंचे चिरंजीव सुजय विखे हे भाजपचे नगर दक्षिणचे उमेदवार आहेत. तिकीट कापल्यामुळे नाराज असेलेल्या दिलीप गांधींची राधाकृष्ण विखेंनी भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय.
खासदार दिलीप गांधींशी आपण चर्चा केली असून त्यांचाही आपल्याला पाठिंबा असल्याचं सुजय विखेंनी नुकतंच म्हटलं होतं. त्यामुळे राधाकृष्ण विखेंची ही भेटही नाराजी दूर करण्यासाठीच तर नव्हती ना, असाही प्रश्न उपस्थित होतो.
कारण, राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुलासाठी विविध ठिकाणी बैठका सुरु केल्या असल्याचंही बोललं जातंय. राधाकृष्ण विखे पाटील हे सध्या काँग्रेसमध्येच असले तरी आपण आघाडीच्या उमेदवाराचा नगरमध्ये प्रचार करणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलंय.