विखे-पाटील लवकरच महाविकास आघाडीत – पालकमंत्री हसन मुश्रीफ

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर लाईव्ह 24 टीम  : विखे-पाटील नाईलाजास्तव भाजपमध्ये गेले आहेत. ते लवकरच महाविकास आघाडीमध्ये दिसतील,  जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले. विशेष म्हणजे  या वेळी त्यांच्यासोबत भाजपचे खासदार सुजय विखे उपस्थित होते. त्यांनी या विधानवर फक्त स्मितहास्य केले. नगरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत मुश्रीफ बोलत होते.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना आपली सत्ता जाणार असे वाटत नव्हते. मात्र, सत्ता गेल्याने त्यांना अचानक मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे ते आता दिवसरात्र टीका करत आहेत, असा टोला पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपला लगावला.

यावेळी मंत्री प्राजक्त तनपुरे, जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले, खासदार सुजय विखे, जिल्हाधिकारी राहुल दिवेदी, प्रभारी पोलीस अधीक्षक सागर पाटील आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना  पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले,  विखे पाटील आपल्या विचारसरणीचे आहेत. नाईलाजास्तव ते भाजपमध्ये गेले आहेत. पुन्हा ते महाविकास आघाडीमध्ये येतील असे मुश्रीफ यांनी सांगताच एकच हास्यकल्लोळ उडाला.

त्यांच्याशेजारी विखे यांचे पुत्र सुजय विखे व्यासपीठवर उपस्थित होते. मुश्रीफ यांचे वक्तव्य ऐकल्यानंतर त्यांनी फक्त स्मितहास्य केले. खासदार विखे यांना याबाबत विचारणा केली असता, आपण यावर काहीही बोलणार नाही, असे त्यांनी सांगितले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24