माजी नगरसेवकाचा प्रताप ! कोरोना रुग्णांच्या घेतल्या भेटी, फोटोही काढले अखेर गुन्हा दाखल…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,20 जुलै 2020 :- अहमदनगरमध्ये कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. पाथर्डी तालुक्यातही रुग्णसंख्या झपाट्याने वाढत चालली आहे. जवळपास हा आकडा शंभरीपार गेला आहे.

त्यामुळे पाथर्डीत प्रशासन सजग झाले आहे. परंतु आता येथे एक धक्कदायक प्रकार घडला आहे. माजी नगरसेवकाने पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोना बाधित रुग्णांना भेटून सोशल मेडीयावर भेटीचे फोटो व्हायरल केले.

या प्रकरणी कोरोना संसर्ग पसरवल्याप्रकरणी माजी नगरसेवक चांद हुमायु मनियार यांच्या  विरोधात सोशल डिस्टन्स न पाळणे,कोरोना रोगाच्या प्रसाराबाबत खबरदारी न घेणे,कोरोना उपाययोजना २०२० चे अधिनियम ११, भारतीय साथरोग अधिनियम १८९७ व आपत्ती व्यवस्थापन कायद्या प्रमाणे पाथर्डी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी तसेच तहसीलदार यांच्या आदेशाचे तसेच कोविड-१९ च्या नियमांचे पालन न करता माजी नगरसेवक चांद हुमायु मनियार यांनी काल रविवारी  प्रतिबंधित क्षेत्र ओलांडून उपजिल्हा रुग्णालयातील पोलीस बंदोबस्तातील पोलीस कर्मचाऱ्यांची नजर चुकवून कोरोना बाधित उपचार घेत असलेल्या उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना भेट घेवून सोशल मेडीयावर फोटो व्हायरल केले होते.अखेर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

ahmednagarlive24@gmail.com

अहमदनगर लाईव्ह 24